Advertisement

संजय रानडे यांच्यावर कारवाई होणार...


संजय रानडे यांच्यावर कारवाई होणार...
SHARES

पत्रकार आणि संज्ञापन विभागाचे विभाग प्रमुख संजय रानडे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. विद्यापीठातील याच विभागातील प्राध्यापक डॉ. सुंदर राजदीप यांचा अश्लील शब्दात अपमान केल्याप्रकरणी राज्यातील अनुसुचीत जातीजमाती आयोगाने विद्यापीठाकडे अहवाल मागवला आहे.

विद्यापीठातील पत्रकार विभागाचे प्रमुख संजय रानडे यांनी याच विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुंदर राजदीप यांचा अपमान केला. अपमान करताना अश्लील शब्दांचा वापर केला. याप्रकरणी सुंदर राजदीप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडेही याविषयी तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या आधारावर संजय रानडे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अद्यापही विद्यापीठाकडून काय कारवाई करण्यात येईल? हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच संजय रानडे यांच्यावर करावाई करण्यात येणार आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालानुसार संजय रानडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा