'आदर्श पुरस्कार रद्द करा'

 wadala
'आदर्श पुरस्कार रद्द करा'
'आदर्श पुरस्कार रद्द करा'
'आदर्श पुरस्कार रद्द करा'
See all

वडाळा - पश्चिम पारसी कॉलनी इथल्या बंसीधर अगरवाल हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमाकांत पाण्डेय यांना मिळालेला शासनाचा आदर्श पुरस्कार रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलीय. तसंच त्यांना कोणत्याही चौकशी समितीत काम करण्यास तत्काळ अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिक्षक-शिक्षकेतर स्थानिक लोकाधिकार समितीने केलीय. 3 ऑक्टोबरला लेखी पत्राद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.

रमाकांत पाण्डेय यांनी मागील 20 वर्षात आपल्या पदाचा, पुरस्काराचा गैरवापर केला. तसेच चौकशीचे चुकीचे आणि खोटे अहवाल देऊन अशैक्षणिक कामे करून शेकडो कर्मचाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्यातूनच त्यांनी बेहिशेबी संपत्ती जमा केली, असल्याचा आरोप इथल्या कर्मचा-र्यांनी केलाय.

Loading Comments