सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSC) बोरीवलीच्या मातुश्री काशीबेन व्रजलाल व्हॅली(MKVV) आंतरराष्ट्रीय विद्यालयाची तात्पुरती संलग्नता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेतल्या 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पुढे आता त्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शाळा बोरीवली पश्चिमवरून पूर्वेकडे हलवण्यात येणार आहे. शाळेच्या निर्णयामुळे पालकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आणि जागा हडपण्यासाठी शाळेविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप करत पालकांनी शिक्षणमंत्र्यांना लक्ष केलंय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
सीबीएसईच्या संलग्नता विभागाने ९ सप्टेंबरला शाळेच्या परिसराची आणि शाळेची तपासणी केली. तपासणीत अनियमितता आढळून आली. त्याचबरोबर पायाभूत सुविधा, सुरक्षा, दुर्लक्षित वर्ग आणि कॉरिडोअरमध्ये असुरक्षिता आढळून आली. त्याचप्रमाणे शाळेची इमारत २२ वर्ष जुनी असल्यामुळे सीबीएसईने तात्पुरती संलग्नता मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि शाळेला यासंबंधी नोटीस पाठवली.
पालकांनी आरोप केला की, शाळेच्या चुकांमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे. शाळेने आम्हाला केवळ व्हाट्सअॅप संदेश पाठविला आहे, ज्यामध्ये आम्हाला बहिष्काराबद्दल माहिती देण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार, शाळा ही १ किलोमीटरच्या आत आसायला हवी. पण आता आमची शाळा पश्चिमेकडून पूर्वेकडे हालवण्यात आली आहे. याचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शाळेची तीन एकरची जागा हडपण्यासाठी सरकारने हे षड्यंत्र रचले आहे. आम्ही या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत, असे मत पालकांनी व्यक्त केले.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)