Advertisement

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८३.४ टक्के निकाल

यंदा १२ लाख ८७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. यात ७,४८, ४९८ विद्यार्थ्यांचा तर ५, ३८, ८६१ विद्यार्थिनींचा समावेश होता. गेल्या वर्षी ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८३.४ टक्के निकाल
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी २ मे रोजी ऑनलाइन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आहे. सर्व विभागांचे निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल cbseresults.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. परीक्षेनंतर २८ दिवसांतच निकाल जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सुखद धक्का बसला आहे. 


मुलींनी बाजी मारली

यंदा १० विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती १६ विभागांत घेण्यात येणार आहे. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. या विभागातील तब्बल ९८.२ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या ९२.३ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं आहे. तर ९१.७८ टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ८८.७ टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं असून हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण ७९.५ टक्के इतकं आहे.


८३.४ टक्के निकाल

सीबीएसई बोर्डाचा यंदाचा निकाल ८३.४ टक्के इतका लागला आहे. यंदा १२ लाख ८७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. यात ७,४८, ४९८ विद्यार्थ्यांचा तर ५, ३८, ८६१ विद्यार्थिनींचा समावेश होता. गेल्या वर्षी ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या वेळी सीबीएसईचे निकाल १० मेपर्यंत जाहीर केले जातील असं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

निवडणुकीमुळं लवकर परीक्षा

गेल्या वर्षी इयत्ता १० वीचे निकाल २६ मे आणि १२ वीचे निकाल २९ मे या रोजी जाहीर करण्यात आले होते. यावेळी निवडणुकीमुळं सीबीएसईच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. तसंच, पेपर तपासणीचं काम देखील १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आलं होतं. यंदा सीबीएसईनं १ कोटी ७० लाख उत्तरपत्रिका तपासण्याचं काम केलं आहे. या उत्तरपत्रिका एकूण ३ हजार तपासणी केंद्रांवर तपासल्या गेल्या असून, एक शिक्षक दिवसाला जवळजवळ २५ उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण करतो.



हेही वाचा -

मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी व शनिवारी पावसाची शक्यता

राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा