Advertisement

CBSE 10th result: दहावीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

बहुप्रतिक्षीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) च्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर बुधवार १५ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे.

CBSE 10th result: दहावीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा
SHARES

बहुप्रतिक्षीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) च्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर बुधवार १५ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षेत यावर्षी ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर महाराष्ट्रातील निकाल ९८.५ टक्के लागला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोणतीही पत्रकार परिषद न घेताच हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सीबीएसईच्या http://cbseresults.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येईल. (cbse class 10th result declared)

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीच्या निकालात त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या क्रमांकावर आहे. 

हेही वाचा- CBSE 10th Result: सीबीएसई दहावीचा निकाल बुधवारी

विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका, मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकर किंवा उमंग अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एसएमएस करुनही विद्यार्थ्यांना निकाल मिळवता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना CBSE10 असं टाईप करुन त्यानंतर एक स्पेस देऊन विद्यार्थ्यांचा रोल नंबर पुन्हा स्पेस हॉल तिकीट आयडी टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

दहावीच्या परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेला हा निकाल हा बेस्ट ऑफ थ्री नुसार लावण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तीन पेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्यापैकी सर्वाधिक गुण मिळालेल्या २ विषयातील सरासरी गुण अन्य न झालेल्या विषयांना देण्यात आले आहेत.  

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र, दिल्ली, ओदिशा सारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास असमर्थतता दाखवल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना ठराविक सूत्रानुसार गुण देऊन निकाल लावण्यात येतील, असं बोर्डाने यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार हा निकाल लावण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement