Advertisement

१ मार्चपासून सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा

दहावी आणि बारावीच्या विविध विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा या जास्तीत जास्त २० गुणांच्या घेतल्या जातील. तसंच एनसीसीसाठी जास्तीत जास्त गुण ३० आहेत.

१ मार्चपासून सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ मार्च ते ११ जून या कालावधीत होणार आहेत. याबाबत सीबीएसईकडून सर्व शाळांना परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 

पत्रकानुसार, सर्व शाळांना ११ जूनपर्यंत प्रकल्पाचे गुण आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर सर्व शाळांना शक्य तितक्या लवकर प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण हे मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अपलोड करायचे आहेत.

प्रॅक्टिकल परीक्षेसंबंधी सूचना

- दहावी आणि बारावीच्या विविध विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा या जास्तीत जास्त २० गुणांच्या घेतल्या जातील. तसंच एनसीसीसाठी जास्तीत जास्त गुण ३० आहेत. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षा मेपासून सुरू होणार असून सर्व परीक्षा १० जूनपर्यंत संपणार आहेत.

- शाळेला आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती ही बोर्डच्या प्रादेशिक कार्यालयात द्यायची आहे. यामुळे प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बाहेरून परीक्षक नेमता येतील.

- शाळांना अंतर्गत परीक्षकांसह प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची परवानगी नाही. जर असं करण्यात आलं तर विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण  रद्द करण्यात येतील आणि त्यांना लेखी परीक्षेच्या आधारावर सरासरी गुण देण्यात येतील.

- ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येईल त्यांचे गुण हे त्वरित एका ग्रुप फोटोसह शाळेने अपलोड करायचे आहेत आणि गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांसहित सगळे गुण हे १ मार्च ते ११ जून पर्यंत अपलोड करायचे आहेत.

सुरक्षेविषयी सूचना 

- दहावी आणि बारावीच्या प्रत्येक बॅचच्या प्रॅक्टिकल परीक्षेनंतर प्रयोगशाळा ही सोडियम हायपोक्लोराइटने स्वच्छ केली पाहिजे.

- सर्व लॅबमध्ये सॅनिटायझर्स असावेत.

- सर्व लॅबमध्ये डस्टबिन असले पाहिजेत आणि त्यांची वेळेची स्वच्छता होणे आवश्यक आहे.

- विद्यार्थ्यांसाठी मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर पाळणं बंधनकारक 

- सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी २५ मुलांच्या बॅचची दोन गटात विभागणी करून प्रॅक्टिकल परीक्षा घेता येऊ शकते.

- जर एखाद्या शाळेने हे सुरक्षेचे नियम पाळले नाहीत तर त्यांना ५० हजारांचा दंड होऊ शकतो.



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा