आता अभ्यास करावाच लागेल

  Mumbai
  आता अभ्यास करावाच लागेल
  मुंबई  -  

  आतापर्यंत आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केले जात होते. पण हे धोरण संपुष्टात येणार आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी नापास झाल्यावर त्याला पुढच्या वर्गात जाता येणार नाही.

  मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना एक संधी देण्यात येणार आहे. हे विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मुक्त आणि सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी अधिकार सुधारणा विधेयकात तरतुदी केल्या जाणार आहेत.

  पाचवी ते आठवीपर्यंत कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नव्हते. केवळ नववीमध्ये विद्यार्थी नापास झाला तर, त्याला दहावीच्या वर्गात जाता येत नव्हते. मात्र आता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापास झाल्यास विद्यार्थ्याला पुन्हा त्याच वर्गात बसवले जाणार आहे.

  हा निर्णय स्वागतार्ह आहे. नापास न करणे याचा अर्थ सर्वांना ढकलत आठवीपर्यंत आणणे असा नव्हता. तर अपेक्षित क्षमता प्राप्त करून देणे असा होता. पण याचा केवळ नापास न करणे असा अर्थ पसरला गेला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आणि नववीत नापास होण्याचे प्रमाण वाढले.


  आता पुन्हा नापास करण्याचे धोरण जरी येत असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता विकसित होतील याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे.
  - अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक परिषद  आतापर्यंत मुलांना आपण अभ्यास केला नाही तरी, पास होऊ याची खात्री होती. त्यामुळे मनापासून अभ्यास कोणी करत नव्हते. आता आपण नापास झालो तर पुन्हा त्याच वर्गात बसावे लागेल या भीतीपोटी का होईना मुले अभ्यास करतील. या आधी मुलांना नववी आणि दहावीचा अभ्यास करणे कठीण जात होते. त्याचप्रमाणे शाळेत जी पायाभूत परीक्षा घेतली जाते. ती पण शिक्षण मंडळाने बंद करावीत.
  - शामल जोशी, पालक  हेही वाचा -

  मुंबईतील ‘त्या’ अनधिकृत शाळा बंद होणार नाहीत!

  घरबसल्या द्या ५ वी ते १२ ची परीक्षा, आलेय 'मुक्त विद्यालय'
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.