Advertisement

जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं खुल्या प्रवर्गातून जबरदस्तीने प्रवेश

मुंबईत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं जाणूनबुजून खुल्या प्रवर्गातून जबरदस्तीने प्रवेश घेण्याची बाब उघडकीस आली आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं खुल्या प्रवर्गातून जबरदस्तीने प्रवेश
SHARES

मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान जातपडताळणी प्रमाणपत्रामुळं उडालेला गोंधळ अद्याप थांबलेला नसल्याचं समोर येत आहे. मुंबईत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं जाणूनबुजून खुल्या प्रवर्गातून जबरदस्तीने प्रवेश घेण्याची बाब उघडकीस आली आहे.


नेमकं प्रकरण काय?

ऋत्विक डोईफोडे या विद्यार्थ्याला सीईटी परीक्षा पास झाल्यानंतर लॉ शाखेसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यानुसार या प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गेला आणि मागासवर्गीय जातीतून अर्ज भरला. परंतु, त्याच्याकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं त्याचा प्रवेश खुला प्रवर्गात असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांने सीईटी सेलकडे धाव घेतली.

त्यानं सीईटी सेलला राज्य सरकारनं १० ऑगस्टपर्यंत दिलेल्या मुदतवाढीबाबत सांगितलं, सीईटी सेलनं मात्र आम्हाला असं कोणतंही परीपत्रक मिळालं नसल्याचं सांगितलं. तसचं त्याला सीईटी सेलनं जोपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र दिलं नाही तर तुझा प्रवेश खुल्या प्रवर्गातूनच करण्यात येईल, असं सांगितलं.


सरकारची नियमावली काय?

राज्य सरकारच्या प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सीईटी सेलतर्फे सप्टेंबर २०१७ ला नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्रांसोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती.

त्यानंतर मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं प्रवेश न दिल्याचं उघडकीस आलं.

त्यानंतर राज्य सरकारनं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे अभियांत्रिकी, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, शासनानं दिलेला हा निर्णय फक्त कागदोपत्रीच राहिला असून त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं प्रवेश रखडले आहेत.


मला लॉ साठी प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी मी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्जही केला आहे. मी प्रवेश करतेवेळी जातपडताळणी अर्ज आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी सेतू केंद्रात धाव घेत जातपडताळणी अर्ज केला. त्याची पावती मी सीईटी सेलला दाखवली. परंतु त्यानतंरही त्यांनी मला प्रवेश देण्यास टाळाटाळ केली.
- ऋत्विक डोईफोडे, विद्यार्थी


महाविद्यालयात जातपडताळणी प्रमाणपत्र घेतल्यानंतर प्रवेश देणार असल्यानं अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश आता रखडणार आहे. त्यामुळं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढावा, नाहीतर स्टुडंट लॉ काऊन्सिल आंदोलन करेल.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कॉऊन्सिल


हेही वाचा -

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ कधीपर्यंत? वाचा...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा