सातवी, नववीची पुस्तके बदलणार

 Pali Hill
सातवी, नववीची पुस्तके बदलणार
सातवी, नववीची पुस्तके बदलणार
See all

मुंबई - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील सातवी आणि नववीची पुस्तके बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. त्यानुसार जून 2017 पासून ही पुस्तके बदलण्यात येणार असून, पाठ्यपुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था यांना आवश्यकतेनुसार पुस्तकांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालण्याकरिता पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत असून, गेल्यावर्षी पाचवी आणि सहावीची पुस्तके बदलण्यात आली होती. यंदा सातवी आणि नववीची पुस्तके बदलली असून, पुढच्या वर्षी जून 2018 मध्ये आठवी आणि दहावीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत.

Loading Comments