Advertisement

अंगणवाडीत मुलं आता मराठीसोबत इतर भाषाही शिकणार...!


अंगणवाडीत मुलं आता मराठीसोबत इतर भाषाही शिकणार...!
SHARES

राज्यातील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना आता मराठीसोबतच इतर भाषाही लिहता वाचता येणार आहे. कारण राज्यातील ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त मुलं मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील त्या गाव, वाडी, वस्तीत ती भाषा शिकवली जाईल. तसेच ती भाषा अवगत असणाऱ्या अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. विधान परिषदेत राज्यात उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरू करण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पंकजा यांनी यासंदर्भात माहिती दिली.


'ही मागणी मान्य होऊ शकत नाही'

मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार असताना उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या का नाहीत असा सवाल अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केला. यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी केल्याचंही निदर्शनास आणून दिलं. उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरू कराव्यात अशी मागणी होत असली तरी अंगणवाडी केंद्राचे कोणतेही माध्यम निश्चित करण्यात आलेलं नाही. अंगणवाडी केंद्रात प्राथमिक शाळांप्रमाणे औपचारिक शिक्षण दिलं जात नाही. त्यामुळे विशेष उर्दू अंगणवाड्या सुरू करण्याची मागणी मान्य करता येऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.


६३५ अंगणवाड्यात १४२ सेविका कार्यरत

राज्यात एकूण ६३५ अंगणवाड्या असून त्यामध्ये १४२ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्यांच्या सोबतीला ३०५ अंगणवाडी मदतनीसही आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली राबवली जाते. केंद्र शासनाने या योजनेंतर्गत धर्म, जात, पंथ, वर्ण आणि भाषा यावरून भेदभाव केलेला नाही. तिथे ५० टक्क्यांहून अधीक मुले जी भाषा बोलतात तीच भाषा अंगणवाडी सेविकेला येणं गरजेचं आहे, त्यामुळे विशेष उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरू करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा