2 हजार 472 शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन

 Pali Hill
2 हजार 472 शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन

मुंबई – राज्य सरकारकडून 2015 पासून भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 आक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेच्या 2 हजार 472 शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा होणार आहे. वाचू आनंदे उपक्रमाखाली हा दिन साजरा होणार असून वाचनासह ग्रंथदिंडीही काढली जाणार. तर व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे नामवंत लेखक, कवी 'हे वाचनाने मला काय दिले' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यंदा 16 पानी किमान 10 छोटी गोष्टीरूप पुस्तके विद्यार्थी वाचणार आहेत. या उपक्रमासाठी पालिकेचा शिक्षण विभाग सज्ज झाल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.

Loading Comments