Advertisement

MPSCची नवीन तारीख जाहीर होईल, येत्या आठवड्यातच परीक्षा घेऊ - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray FB live ) यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना MPSC च्या निर्णयाबद्दलम मोठी घोषणा केली.

MPSCची नवीन तारीख जाहीर होईल, येत्या आठवड्यातच परीक्षा घेऊ - मुख्यमंत्री
SHARES

येत्या १४ मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC नं जाहीर केला होता. यावरून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray FB live ) यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना MPSC च्या निर्णयाबद्दलम मोठी घोषणा केली. त्यांनी आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, पुढच्या आठडाभरात परीक्षा निश्चित होईल.

आपली लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. परीक्षा यंत्रणा खूप मोठी आहे. कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट झाल्यानं परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वेळ लागत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग परीक्षेदरम्यान होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेसाठी देण्याची सूचना मी केली आहे, असंही ते म्हणाले. यंत्रणेतल्या सर्वांची कोरोना चाचणी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावर्षी मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. गेल्या दीड वर्षांत पाचव्यांदा परीक्षा रद्द झाल्याने किंवा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली होती. अगदी चार दिवस राहिलेले असताना परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. त्याचं पर्यवसन उद्रेकात झालं.

शेकडो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरले. MPSC अभ्यासिकेतील २ हजार मुलं रास्तारोकोत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आयोगाचा निषेध व्यक्त केला.

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, रस्त्यावर उतरू नये सरकार विद्यार्थ्याच्या भावानांशी सहमत आहे,' असं सांगितलं होतं.

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रक आयोगानं काढलं होतं. दुपारी आयोगाचं निवेदन आल्यानंतर संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांचा असंतोष धुमसत राहिला.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा