वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

 BMC office building
वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

परळ - मुंबईतील सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी 4 डिसेंबर 2016 रोजी वाद-विवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यंदा स्पर्धेसाठी 'आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांतामुळे भारतीय सामाजिक एकतेची अपरिमित हानी झाली आहे' हा विषय निश्चित करण्यात आलाय. ही स्पर्धा सर्व वरिष्ठ महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पण 25 वर्षे वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं मागील 13 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतंय. या स्पर्धेत 21 व्या शतकातील नव्या पिढीनं आपल्या पूर्वसुरींनी घडवलेल्या आणि लिहिलेल्या इतिहासाचा तसेच आर्य, द्रविडांच्या इतिहासाच्या सिद्धांताचा अभ्यास करावा आणि या विषयांच्या दोन्ही बाजूंवर चर्चा व्हावी, या हेतूनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचे माध्यम मराठी असल्यानं स्पर्धेच्या विषयाची मांडणी मराठीतच करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येक महाविद्यालयाने दोन विद्यार्थ्यांच्या संघ पाठवायचा आहे. एका संघाने विषयाच्या बाजूने तर दुसऱ्या संघाने या विषया विरुद्ध मांडणी करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघासाठी 250 रुपये नोंदणी शुल्क असून, नोंदणीकृत कार्यालयाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वडाळा या पत्यावर ता. 25 नोव्हेंबर 2016 पर्यंत पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क -022-241855032/ 24136966

Loading Comments