Advertisement

मुंबईतल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार सवलती


मुंबईतल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार सवलती
SHARES

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ एसटी प्रवासाचा मोफत पास देण्यात यावा, तसंच दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी मुंबई तसंच इतरत्र ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांनाही मोफत एसटी पास आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या इतर सर्व सवलती देण्यात असल्याची छात्रभारती विद्यार्थी संघटनाची महत्त्वाची मागणी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.


मुख्यमंत्र्यांशी घडवून आणली भेट

गेल्या काही दिवसांत शासनानं मराठी शाळा बंद पाडल्या असून, आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे, शिक्षकभरती बंद, यांसह विविध कारणासाठी छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि विविध विद्यार्थी संघटनाच्यावतीनं १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान पुणे ते मुंबई येथं लाँगमार्च काढण्यात आला होता. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी हा लाँगमार्च मुंबईजवळ दाखल होताच त्याची तात्काळ दखल घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.


मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

यावेळी दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ एसटी प्रवासाचा मोफत पास देण्यात यावा, तसंच दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी मुंबई तसंच इतरत्र ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्यांनाही मोफत एसटी पास आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या इतर सर्व सवलती देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण मागणी मान्य केली. तसंच राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी करून स्थगित शिष्यवृत्या पूर्ववत सुरू कराव्यात आणि शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा कार्यक्रम शासनाने जाहीर करावा या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्याच्या वतीनं देण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा