Advertisement

दिवाळी तोंडावर आली, पण सुट्टीबाबत संभ्रमच!

दिवाळी चार दिवसांवर आलीये पण अद्याप शिक्षण विभागाकडून शाळांना अधिकृत परिपत्रक देण्यात आले नाही. त्यामुळे नेमके किती दिवस सुट्टी द्यावी याबाबत संभ्रम आहे.

दिवाळी तोंडावर आली, पण सुट्टीबाबत संभ्रमच!
SHARES

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. मात्र, अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून कोणतीच स्पष्टता आलेली नाही.  शाळांना नेमकी किती दिवस सुट्टी असेल? याबाबत अधिकृत परिपत्रक अद्याप शाळांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शाळांना नेमकी किती दिवस आणि कधीपासून सुट्टी द्यायची? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

यावर्षी १६ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. मात्र, ती सुट्टी किती तारखेपर्यंत द्यावी? याबाबत संभ्रम आहे. अनेक शाळा या ६ नोव्हेंबरपासून तर काही शाळा ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतेच अधिकृत परिपत्रक जाहीर झालेले नाही.

यावर्षी दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आल्यामुळे मुळातच शिक्षक आणि विद्यार्थी नाराज आहेत. दरवर्षी २० दिवसांची दिवाळीची सुट्टी शाळांना मिळते. मात्र, यावर्षी पावसामुळे काही दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली होती. ती पावसाची सुट्टी दिवाळीच्या सुट्टीत भरून काढायची असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे, यावर्षी दिवाळीची सुट्टी कमी झाली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा