Advertisement

Coronavirus Updates: सीबीएसईच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई), राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ (एनआयओएस) सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

Coronavirus Updates: सीबीएसईच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंडळ (CBSE), राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ (NIOS) सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, जेईई मुख्य परीक्षांच्याही तारखा देखील बदलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिल्यानंतरही परीक्षा वेळापत्रकाप्रमाणंच घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, परीक्षांच्या दरम्यान केंद्रांबाहेर होणारी गर्दी, विद्यार्थी आणि पालकांमधील ताण लक्षात घेऊन आता ३१ मार्चपर्यंत सीबीएसई आणि एनआयओएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं (Ministry of Manpower Development) घेतला आहे.

केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या दहावीच्या बहुतेक महत्वाच्या विषयांची परीक्षा झाली आहे. बारावीच्या वेळापत्रकावर मात्र या निर्णयाचा परिणाम होणार आहे. बारावीच्या वाणिज्य शाखेच्या २ आणि कला शाखेच्या ३ विषयांची परीक्षा आता एप्रिलमध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या मूल्यांकनाचे कामही ३१ मार्चपर्यंत थांबवण्यात येणार आहे.

जेईई मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचाही विचार करण्यात येत आहे. आताच्या वेळापत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा ५ ते ११ एप्रिल दरम्यान होणार आहे. मात्र, सीबीएसई, विद्यापीठे आणि एनआयओएसच्या परीक्षा आणि जेईईच्या परीक्षा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेईईच्या परीक्षांचे वेळापत्रकही बदलावे लागू शकते असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे. ३१ मार्चनंतर परीक्षांबाबत पुढील आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासीसंख्येत १७ लाखांची घट

Coronavirus Updates: 'या' १० खाजगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा