Advertisement

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'इतक्या' शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळा बंद असल्यानं ऑनलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुकर व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं कंबर कसली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'इतक्या' शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण
SHARES

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक मंडळानं शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं मागील अडीच महिने शाळा बंद होती. मात्र, दरवर्षी जून महिन्यात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सुरू होतं. परंतु, यंदा कोरोनामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा न झाल्यानं शैक्षणित वर्षही उशिरानं सुरू होणार असल्याची चर्चा आहे. असं असलं तरी कोरोनामुळं यंदा ऑनालाइन शिक्षणाकडं विद्यार्थी व पालकांचा कल आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळा बंद असल्यानं ऑनलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुकर व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. 

सोमवारपासून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून, मुंबईतील तब्बल ३ हजारहून अधिक शाळांमधील सुमारे २० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिका शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील शैक्षणिक व तांत्रिक कौशल्यं विकसित करण्यासाठी महापालिकेकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये ९ जूनला पश्चिम उपनगर व १० जूनला मुंबई शहर या विभागातील प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत.

सोमवारी झालेल्या प्रशिक्षणाला ७ हजारांहून अधिक शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांचे नवीन आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समुपदेशन करणं, सर्व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य ती तांत्रिक कौशल्यं शिकवणं, अॅनिमेशन, प्रेझेंटेशन, व्हिडीओ निर्मिती कशी करावी, झूम, गुगल मीट, गुगल क्लासरूम, फेसबुक, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअॅप व हँग आऊट इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं हे या प्रशिक्षणाचं प्रमुख उद्दीष्ट आहे.हेही वाचा -

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या ८० हजार ५३२ जणांची वाहतूक जप्तRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा