Advertisement

कोकण विद्यापीठाचा निर्णय जुलैपूर्वी, तावडे यांचं आश्वासन

मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून नव्या कोकण विद्यापीठाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. याबाबत विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी चर्चा सुरू केली. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाबाबत कोकणातील सर्व लोकप्रतिनिधीची बैठक घेण्यात येईल आणि जुलैपूर्वी त्यावर निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन दिलं.

कोकण विद्यापीठाचा निर्णय जुलैपूर्वी, तावडे यांचं आश्वासन
SHARES

मुंबई विद्यापीठात ८०० महाविद्यालयाचा समावेश असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. परिणामी शिक्षणाचा दर्जा खालवत चालला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून नव्या कोकण विद्यापीठाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. याबाबत विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी चर्चा सुरू केली. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाबाबत कोकणातील सर्व लोकप्रतिनिधीची बैठक घेण्यात येईल आणि जुलैपूर्वी त्यावर निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन दिलं.


१०३ महाविद्यालयाचं विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालय आणि विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यापीठावरील ताण वाढल्याने रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयाची गैरसोय होत आहे. याचा विचार करून रत्नागिरीतील ४५, सिंधुदूर्ग ३८, रायगड २० अशा एकूण १०३ महाविद्यालयासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावं, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ झाल्यास शिक्षणाचा दर्जा सुधारेल, असं सांगण्यात येत आहे.


कामाचा ताण कमी

अनेक विद्यापीठांचं यापूर्वी विभाजन झालं आहे. त्यामुळे स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी होणं साहजिक आहे. केवळ अस्मितेच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विद्यापीठाची मागणी होत असेल, तर मुंबई विद्यापीठाचं महत्त्व कमी करता येणार नाही. कारण मुंबई विद्यापीठातील वाढत्या कामाचा विचार करून प्रशासकीय कामकाज ऑनलाइन करण्यात आलं आहे, असं तावडे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा