इंजिनीअरिंग परीक्षेचा तिढा सुटला, परीक्षेदरम्यान सुट्ट्या कायम

येत्या उन्हाळी परीक्षेदरम्यान इंजिनीअरिंगच्या परीक्षेमधील सुट्टी कमी करण्यात निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून या परीक्षा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच होतील, अस परिपत्रक मुंबई विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आले आहे

SHARE

इंजिनीअरिंग परीक्षेत एका पेपरनंतर दुसऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना हमखास पाच ते सहा दिवसांची सुट्टी असते. यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या पेपरचा अभ्यास करता येतो. परंतु येत्या उन्हाळी परीक्षेदरम्यान इंजिनीअरिंगच्या परीक्षेमधील सुट्टी कमी करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. या परीक्षा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असं परिपत्रक मुंबई विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे इंजिनीअरिंग परीक्षेचा तिढा अखेर सुटला असून, इंजिनीअरिंग शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 


नेमकं प्रकरण काय ?

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे प्रत्येक इंजिनीअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप करावी असा नियम तयार करण्यात आला आहे. या नियमावलीनुसार मुंबई विद्यापीठातंर्गत बुधवारी इंजिनीअरिंग प्राध्यापकांची बैठक पार  पडली. या बैठकीत  इंटर्नशिपबाबत कॉलेज कशी तयारी करत असल्याचा आढावा घेण्यात आला. परंतु यावेळी काही प्राचार्यांनी इंटर्नशिप देण्यास वेळच मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठ स्तरावर दाखल केली. या तक्रारीनुसार विद्यापीठ प्रशासनाने परीक्षेच्या काळातील सुट्ट्या कमी कराव्यात आणि हाच वेळ इंटर्नशिपसाठी द्यावा असा प्रस्ताव सुचवला. या प्रस्तावाला इंजिनिअरींग शाखेतील विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला. 


पुढील वर्षापासून लागू

मुंबई विद्यापीठाच्या या प्रस्तावाला होणारा विरोध लक्षात घेता, विद्यापीठाने हा प्रस्ताव यंदाच्या परीक्षेसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावित वेळापत्रक २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी एक दिवस सुट्टीचा नवा प्रस्ताव लागू न करण्याचा निर्णय घेतला असून यंदाच्या परीक्षा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत. परंतु, पुढील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून हा प्रस्ताव लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.हेही वाचा -

कुलाबा संक्रमण शिबिरातील कुटुंबियांना हक्काचं घर मिळणार

चक्रे फिरली, पोलिसांची ८ तासांची ड्युटी पुन्हा १२ तासांवर
संबंधित विषय
ताज्या बातम्या