धारावीत ‘शिक्षण आणि पर्यावरण' उपक्रम

 Sant Kakkaya Marg
धारावीत ‘शिक्षण आणि पर्यावरण' उपक्रम

धारावी - युवा विद्यार्थ्यांचे मानसिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने धारावीतील संत कक्कया रोडवरील श्री गणेश विद्या मंदिर शाळेमध्ये सोमवारी ‘शिक्षण आणि पर्यावरण’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम एण्ड्रेस हॉसर आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबईच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

श्री. गणेश विद्या मंदिर ही मुंबईमधील धारावी येथील मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे आणि धारावी झोपडपट्टीतील मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. झोपडपट्टीमध्ये जवळपास 150 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची मुले आहेत.

प्रत्येक मुलामध्ये चांगले विचार रुजले पाहिजेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक क्षमतांना चालना, शैक्षणिक यश, सकारात्मक वर्तन आणि चांगले विचार प्राप्त करण्याची प्रेरणा मिळेल असं व्यवस्थापकीय संचालक संजीव नाथ यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचा मुख्य हेतू एकाच वेळी पाण्याची बचत आणि नैसर्गिक संसाधन जतनाला चालना देण्याबाबत आहे. दरम्यान उपक्रमाचा एक भाग म्हणून मुलांना वह्या, पेन्सिल सेट्सचे वाटप करण्यात आले.

Loading Comments