Advertisement

महाराष्ट्र उत्सव स्पर्धेत रुपारेलची बाजी

यंदाच्या महाराष्ट्र उत्सवात निम्म्याहून जास्त स्पर्धेत डी. जी. रुपारेल काॅलेजने एकहाती वर्चस्व राखलं. या कामगिरीच्या जोरावर रुपारेल काॅलेजने या उत्सवात सर्वोत्कृष्ट काॅलेजच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.

महाराष्ट्र उत्सव स्पर्धेत रुपारेलची बाजी
SHARES

पर्णिका संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र उत्सव स्पर्धेत डी. जी. रुपारेल काॅलेजने बाजी मारली आहे. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. तर यंदाच्या उत्सवात निम्म्याहून जास्त स्पर्धेत डी. जी. रुपारेल काॅलेजने एकहाती वर्चस्व राखलं. या कामगिरीच्या जोरावर रुपारेल काॅलेजने या उत्सवात सर्वोत्कृष्ट काॅलेजच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.

या उत्सवात विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रामनारायण रुईया काॅलेजला दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. तर म. ल. डहाणूकर काॅलेजने तिसरं स्थान पटकावलं. देविप्रसाद गोयंका काॅलेजला सर्वोत्कृष्ट संघ पुरस्काराने गौरविण्यात आलं.



कुठे झाला उत्सव?

काॅलेज विद्यार्थ्यांसाठी हा राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी युवा महोत्सव खूप महत्त्वाचा असतो. १५-१६ डिसेंबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवाचे यंदाचं २४ वं वर्ष होतं. या उत्सावात राज्यभरातील एकूण ९० काॅलेजांनी सहभाग घेतला. यात पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथील काॅलेजांचा प्रामुख्याने समावेश आहे.



कुठल्या स्पर्धेत कुणाची बाजी?

मराठी रॉक बॅन्ड, शब्दांपलिकडे, लोकनृत्य, मुकनाट्य, कल्पनाविस्तार, पथनाट्य या स्पर्धेत रुपारेल काॅलेजने प्रथम क्रमांक पटकावला. तर लावणी स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांत रुपारेल काॅलेजच्या विद्यार्थीनींनी बाजी मारली. स्पर्धेत 'उत्सव किंग' आणि 'क्वीन'साठीचा ‘मानाचा फेटा’ रुपारेल काॅलेजच्या अनुक्रमे आशुतोष गायकवाड आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी मिरवला. कोल्हापूरच्या शिक्षण महर्षि काॅलेजमधील शरद पाटीलने छायाचित्रीकरण या स्पर्धेत आपला ठसा उमटवला.



परीक्षांचं होतं सावट

यंदाचा उत्सवावर परीक्षांचं सावट होतं, असं असताना विद्यार्थ्यांनी जिद्दीने सगळ्या अर्थात २० स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. उत्सवाचं पुढचं वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे. रौप्य महोत्सवात 'विशेष स्पर्धा' आणि विद्यार्थ्यांसाठी 'सरप्राईज'ची तयारी आतापासून सुरू करण्यात आलेली आहे, असं पर्णिका संस्थेचे अध्यक्ष उमेश पवार यांनी सांगितलं.



हेही वाचा-

एम.ए, एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्या!

म्हणून, आयआयटी प्लेसमेंट्सच्या पहिल्या टप्प्यात चुरस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा