'इ लर्निंग' साहित्याचे उद् घाटन

 Kings Circle
'इ लर्निंग' साहित्याचे उद् घाटन
'इ लर्निंग' साहित्याचे उद् घाटन
'इ लर्निंग' साहित्याचे उद् घाटन
See all

माटुंगा - लेबर कॅम्प येथील बनियन ट्री इंग्लिश स्कूलसाठी देण्यात आलेल्या ''इ लर्निंग'' अभ्यासक्रमाच्या साहित्याचे उद्घाटन ट्रस्टचे विश्वस्त सुनील जोगळेकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टकडून हे साहित्य देण्यात आले आहे. यावेळी ट्रस्टच्या कंट्री हेड अंजली वजीर, विश्वास श्रीखंडे, परवेझ दामानिया, शाळेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद देठे, वरिष्ठ सदस्य के.सी.गांगुर्डे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

' 'ई लर्नींग पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक लेसन या स्क्रीनवर पाहता येईल व एकच वेळी प्रत्येक प्रश्नांवर शिक्षकांशी विद्यार्थ्यांना चर्चा करता येऊ शकेल. यामुळे मुलांच्या ज्ञानात अधिक भर पडेल आणि यातूनच उद्याचा प्रगत भारत घडेल', अशी अशा ट्रस्टचे विश्वस्त सुनील जोगळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Loading Comments