दहावीच्या गुणपत्रिकेवरच 'बर्थ प्लेस'

 Pali Hill
दहावीच्या गुणपत्रिकेवरच 'बर्थ प्लेस'

मुंबई - दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवरच जन्मतारीख आणि जन्मस्थळ देण्यात येणार आहे. यासाठी प्रमाणपत्रावरही जन्मतारखेसह जन्म ठिकाणाची नोंद करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २०१७ पासून हे प्रमाणपत्र अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. हे प्रमाणपत्र आता विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट तसेच दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला अशा अनेक गोष्टींसाठी पुरावा म्हणून वापरता येणार आहे.

Loading Comments