'करियर घडवण्यासाठी शिक्षण हा एक मेव मार्ग'

 Dadar
'करियर घडवण्यासाठी शिक्षण हा एक मेव मार्ग'

दादर - समाजात विकास घडवायचा असेल तर प्रथम आपले करिअर घडवण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचं मत मुंबई विद्यापिठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिल राघव यांनी व्यक्त केलं. ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडी यांच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दादर (पू) इथल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात रविवारी 'एकजुटीतून विकासाकडे' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी डॉ. अनिल राघव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम कुदळे, अखिल महाराष्ट्र कुणबी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन पाडावे, राज राजापूरकर, प्रकाश मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments