Advertisement

मनोहर कोतवाल शाळेवर कारवाई होणार?


मनोहर कोतवाल शाळेवर कारवाई होणार?
SHARES

विक्रोळी - मनोहर कोतवाल शाळा प्रशासनाच्या मुजोरीची बातमी 'मुंबई लाइव्ह'नं सतत दाखवल्यानंतर आता या बातमीची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे. या शाळेतील सर्व गैरप्रकारांची माहिती त्यांनी मागविली असून, ते स्वत: यामध्ये जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

फी न भरल्यामुळे मुलांना जमिनीवर बसविले जाते याबाबतचा स्पेशल रिपोर्ट मुंबई लाइव्हनं प्रसारित केला होता. चेंबूर मधील शिक्षक निरीक्षक यांच्या कार्यालयात पालक, मनोहर कोतवाल शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि ट्रस्टी यांची गुरुवारी दुपारी १२.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकांच्या वतीने राधिका सागवेकर, वर्षा गुरव आणि स्वप्ना लोंडे सहभागी झाल्या होत्या. बैठकीत पालक, मुख्याध्यापक आणि ट्रस्टी सर्वांचा जबाब शिक्षण उपनिरीक्षक अनिल साबळे यांनी नोंदविला आहे.

विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर 1 मधील मनोहर कोतवाल माध्यमिक शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना जमिनीवर बसविणे, तसेच दिवसेंदिवस शाळेच्या फीमध्ये होणारी वाढ, अस्वच्छ पिण्याचे पाणी, इमारती आणि शौचालय दुरवस्था हे सर्व मुद्दे पालकांनी मांडले. बैठकीत पालकांनी मांडलेले सर्व मुद्दे बरोबर असल्याचे उपनिरीक्षक यांच्या लक्षात आले. तर दुसरीकडे या बैठकीत मुख्याध्यापक आणि ट्रस्टी यांच्यातील वाद उघडपणे समोर आला. फी न भरल्यामुळे शाळेने मुलांशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल शिक्षण उपनिरीक्षक अनिल सागवे यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि ट्रस्टी यांना खडसावले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा