Advertisement

विद्यार्थ्यांनो, आता सुट्टी करा एन्जॉय


विद्यार्थ्यांनो, आता सुट्टी करा एन्जॉय
SHARES

मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली आहे.

याआधी मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय होता. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांसहित शिक्षकांकडूनही टीका होऊ लागल्याने अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

दरवर्षी परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असे.

मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले होते. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या होत्या.


शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला

मार्चमध्ये मुलांना सुट्टी दिली की शाळांमध्ये निकाल, वार्षिक कागदपत्रांची पूर्तता अशी कामे सुरू होतात. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका सुरू होतात. आता मुले शाळेत येणार असतील तर हे काम कधी करायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत होता. त्यामुळे शिक्षण विभागाने अखेर हा निर्णय मागे घेतल्याने शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा