Advertisement

विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणार 'रोबोमेट+'

‘रोबोमेट प्लस’ या मोबाईल अॅपमुळे (संगणकीय प्रणाली) विद्यार्थ्यांना अभ्यास करणं सोपं झालं आहे. या मोबाईल अॅपमुळे विद्यार्थ्यांना आता कधीही आणि केव्हाही अभ्यास करता येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टनं तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अ‍ॅपचं अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं.

विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणार 'रोबोमेट+'
SHARES

देशाला डिजिटल इंडियाचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलं. आता पंतप्रधानांच्या या स्वप्नानंच प्रेरित होत महाराष्ट्रात शाळांच्या संगणकीकरणास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धतदेखील आता डिजिटल होणार आहे. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टनं तयार केलेल्या ‘रोबोमेट प्लस’ या मोबाईल अॅपमुळे (संगणकीय प्रणाली) विद्यार्थ्यांना अभ्यास करणं सोपं झालं आहे. या मोबाईल अॅपमुळे विद्यार्थ्यांना आता कधीही आणि केव्हाही अभ्यास करता येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टनं तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अ‍ॅपचं अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं.


विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगचा आणखी एक पर्याय

विद्यार्थ्यांसाठी रोबोमेट हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी हा उत्तम ई मार्ग उपलब्ध झाला आहे. इयत्ता ९ वी ते १२वीच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचा यात समावेश आहे. तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवलेले सर्व विषयांचे व्हिडीओ अगदी सोप्या भाषेत या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांचा अभ्यासक्रम या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी हवं तिथं हवं तेव्हा अभ्यास करू शकतात. याचा फायदा राज्यातील दुर्गम भागातील, तळागाळातील विद्यार्थीही घेऊ शकतात. रोबोमेट प्लस अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.


विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत

डिजिटल इंडियांतर्गत असलेलं हे अ‍ॅप वापरल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचं स्वप्न साकार होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

या अ‍ॅपमध्ये प्रश्नोत्तरं, प्रश्नपत्रिकांचं स्वरुप, बहुपर्यायी प्रश्न, कठीण संकल्पना सोप्या भाषेत, शंकानिरसन अशा सर्व बाबींचा समावेश आहे. त्याचा वापर विद्यार्थी कधीही, कुठेही करुन गुणांमध्ये भरघोस वाढ करू शकतो, असा दावा ट्रस्टनं केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा