Advertisement

CET परीक्षांच्या तारखा जाहीर, 'या' कालावधीत होणार परीक्षा

तंत्र शिक्षण विभागानं सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

CET परीक्षांच्या तारखा जाहीर, 'या' कालावधीत होणार परीक्षा
SHARES

तंत्र शिक्षण विभागानं सीईटी (CET Exam 2021) परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान ही पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अभ्यासक्रम निहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू होईल असंही सामंत म्हणाले.

राज्यभरात लाखो विद्यार्थी सीईटीची परीक्षा देणार असून यामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सर्व परीक्षा केंद्रांना कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करत परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यभरातील ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देतील. यासाठी राज्यात २२६ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

ज्या दिवशी या परीक्षा असतील त्या दिवसापुरता विद्यार्थ्यांना ट्रेननं प्रवास करू द्यावा ही विनंती केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत असंही उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

गेल्या वेळी राज्यात एकूण १९८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. २२६ केंद्रांवर ५० हजार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनीं दिली आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर काही महत्त्वाच्या अभयसक्रमांसाठी CET परीक्षा घेतली जाणार आहे. या सर्व परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे.

सामंत म्हणाले की, सीईटीची परीक्षा झाल्यानंतर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये १० ऑक्टोबरनंतरच सुरू करण्यात येतील अशी शक्यता आहे. परंतु, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यताही तज्ञांकडून वर्तवली जात आहे.हेही वाचा

राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार! आदर्श शाळांसाठी ४९४ कोटी मंजूर

मुंबई विद्यापीठाला नॅकचं A++ मानांकन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा