Advertisement

तीन महिन्यांनंतरही नववी-दहावीचे विद्यार्थी टॅबविनाच


तीन महिन्यांनंतरही नववी-दहावीचे विद्यार्थी टॅबविनाच
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने पालटले तरी अद्याप टॅब मिळालेले नाहीत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नादरम्यान ही लेखी माहिती दिली अाहे.


३६०० टॅब हे मेमरी कार्डविना पडून

भाजप अामदार भाई गिरकर यांना तारांकित प्रश्नाद्वारे या मुद्द्याला वाचा फोडली होती. अाश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेतील ३६०० टॅब हे मेमरी कार्डविना धूळखात पडून असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं अाहे. नववीतील विद्यार्थ्यांसाठी १८,०७८ टॅब खरेदी करण्यासाठी जुलै महिन्यात निविदा मागवली होती. चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतर फक्त दोघांनीच त्याला प्रतिसाद दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या एकूण ४३,८४३ पैकी ३६०० टॅबमधील मेमरी कार्ड गहाळ झालं अाहे. त्यामुळे हे सर्व टॅब कार्डविना बंद असून ३६०० मेमरी कार्ड खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली अाहे.


मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पकडलं कोंडीत

भाजपच्याच अामदाराने तारांकित प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने लेखी उत्तर दिलं. पण हे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडल्याचं चित्र सध्या तरी दिसत अाहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा