Advertisement

लॉकडाऊनमुळं १२वीच्या परीक्षेचा निकाल रखडणार

लॉकडाऊनअभावी शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना मोठा फटका बसला आहे.

लॉकडाऊनमुळं १२वीच्या परीक्षेचा निकाल रखडणार
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त सामान्यांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. या लॉकडाऊनअभावी शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना मोठा फटका बसला आहे. या लॉकडाऊनदरम्यान १० वीची परीक्षा रद्द करण्यात आली, तर लॉकडाऊनपूर्वी १२ वीची परीक्षा झाली. परंतु या कोरोनामुळं पेपर तपासणीबाबत व HSC बोर्डच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्याबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही.

दरवर्षी एप्रिल अथवा मेपर्यंत पेपर तपासणीनंतर १२ वीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर केला जातो. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचा १२वीच्या निकाल जाहीर होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रथम वर्षाच्या (FY) विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस विलंब होऊ शकतो.

यासंदर्भात मुंबई लाइव्हनं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळं राज्यसरकारकडून झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार, 'लाल आणि भगव्या झोनमध्ये सध्या पेपरचं आकलन करणं कठीण असून, या भागात कोरोनाच्या संसर्गामुळं होणारी समस्या अधिक आहे. त्यामुळं आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. परंतु, ग्रीन झोनमध्ये पेपरचं मूल्यांकन करण्याची परवानगी देऊन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. 

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं की, 'यूजीसीकडून याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, परंतु आम्हाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. माहिती मिळणं हे मागील आठवड्यात अपेक्षित होतं. मात्र, आम्हाला काहीच सांगण्यात आलं नसल्यानं पुढील काही दिवसांत आम्ही एक संघ या नात्याने निर्णय घेऊ शकतो'.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर शिक्षण मंत्रालयानं इयत्ता ९ व ११ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.तसंच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं ९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत लॉकडाऊननंतर निर्णय घेण्यात येईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा