Advertisement

भाटिया रुग्णालयात कम्युनिटी कनेक्ट उपक्रम


भाटिया रुग्णालयात कम्युनिटी कनेक्ट उपक्रम
SHARES

मुंबईतील भाटिया हॉस्पिटलतर्फे मंगळवारी जागतिक गुणवत्ता सप्ताहाचं सेलिब्रेशन म्हणून कम्युनिटी कनेक्ट कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. भाटिया हॉस्पिटल परिसरात झालेल्या या कार्यशाळेत अन्नभेसळ, सुरक्षित आहार, संसर्गापासून संरक्षण आणि योग्य व्यायाम या विषयांवरील सत्रांचं आयोजन करण्यात आलं असून आपण खाल्लेलं अन्न किती सुरक्षित आहे वा भेसळयुक्त आहे, याबाबतची प्रात्यक्षिक लोकांना दाखवण्यात आली.


'या' उद्देशानं कार्यक्रम आयोजित

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जगभरात जागतिक गुणवत्ता दिवस साजरा केला जातो. आहार, संसर्ग नियंत्रण, आहाराचा दर्जा, सुरक्षा आणि व्यायाम करण्याच्या योग्य पद्धती या सध्याच्या ट्रेंड्सबाबत शहरातील रहिवाशांमध्ये जागरुकता वाढवण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


'ही' प्रात्यक्षिकं सादर

या उपक्रमातून आपण खाल्लेलं अन्न सुरक्षित आहे वा भेसळमुक्त आहे, हे कशाप्रकारे तपासता येते, याची माहिती सर्वसामान्य लोकांना प्रात्यक्षिकांतून दाखवण्यात आली. या उपक्रमादरम्यान काही कृषी तत्रज्ञांनी डाळी, दूध, तेल, मध, भाज्या, मीठ यांसह विविध घरगुती स्वयंपाक घरातील वस्तुंची भेसळची प्रात्यक्षिकं दाखवली.

या कार्यशाळेत एच१एन१ सारख्या आजाराच्या संक्रमणापासून कसा बचाव करावा, याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. त्याशिवाय हॉस्पिटलच्या फिजियोथेरपी विभागातील तज्ज्ञांकडून व्यायाम आणि निरोगी राहण्याचं काही टिप्सही देण्यात आल्या.

भाटिया रुग्णालय हे देशाच्या आरोग्य सेवेत एक प्रतिष्ठित नाव असून अनेक ठिकाणाहून लोक आमच्या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये असणाऱ्या जागतिक गुणवत्ता दिवसाच्या निमित्तानं कम्युनिटी कनेक्ट कार्यशाळा आयोजित केलं होतं. या कार्यशाळेत आहार, संसर्ग नियंत्रण, आहाराचा दर्जा, सुरक्षा आणि व्यायाम करण्याच्या योग्य पद्धती या सध्याच्या ट्रेंड्सबाबत शहरातील रहिवाशांमध्ये जागरुकता वाढण्यासाठी महत्तवपूर्ण अशा टिप्स देण्यात आल्या.
- राजीव बावधनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, भाटिया रुग्णालय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा