Advertisement

दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, 'ही' आहे नवीन तारीख

मुंबईतील शाळा सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद असल्याने विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठीही शाळेत येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कसे भरायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, 'ही' आहे नवीन तारीख
SHARES

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. दहावी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत काल सोमवारी ११ जानेवारीला संपली आहे. मात्र, निम्म्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाने अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे.

मुंबईतील शाळा सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद असल्याने विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठीही शाळेत येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कसे भरायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. अद्याप ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणे बाकी आहे. त्यामुळे दहावी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली.

दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.हेही वाचा -

प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुर्घटनांचे सत्र सुरूचRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा