Advertisement

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास राज्य मंडळातर्फे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ
SHARES

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास राज्य मंडळातर्फे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. काेराेनामुळे तसंच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याने ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १९ ते २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज भरणे शक्य होणार नाही अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान अर्ज भरण्याची संधी राज्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर कॉलेजमधील जनरल रजिस्टरशी माहिती पडताळून खात्री करून घ्यावी, त्यानंतरच अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचवि डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरताना काही उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व विषय याेजने संदर्भात अडचणी येत आहेत. विषय योजनेसंदर्भात शिक्षण विभागाने सोमवारी शासन आदेश काढत वर्षभर केलेल्या अभ्यासाचीच परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना विषय निवडीची सुविधा उपलब्ध करून देत अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! वर्षभर अभ्यास केलेल्या विषयांचीच परीक्षा होणार

महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर सीसीटीव्हीची नजर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा