Advertisement

बी.एड, एम.एड प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) कडून बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बी.एड, एम.एड प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ
SHARES

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) कडून बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची तारीख सीईटी सेलकडून वाढविण्यात आली आहे.

नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याने शिक्षक, प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बी.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आता शुक्रवारपर्यंत आणि एम.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी बुधवारपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाचा शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे राज्यभरात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. तर मोजक्याच शाळांमध्ये ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. अशा स्थितीत बी.एड आणि एम.एडच्या प्रवेश प्रक्रियेत मिळालेली मुदतवाढ विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे.



हेही वाचा -

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा