Advertisement

पोरांनो..टेन्शन नॉट! कला-क्रीडाचे जादा गुण मिळणार!


पोरांनो..टेन्शन नॉट! कला-क्रीडाचे जादा गुण मिळणार!
SHARES

कला व क्रीडाक्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल दहावीच्या परीक्षेत जादा गुण दिले जातात. अंतिम टक्केवारीमध्ये याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. यंदा मात्र कलेच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएटचा निकाल उशिरा जाहीर झाला. त्यातच प्रस्ताव पाठविण्याची मुदत २० जानेवारी रोजी संपली. त्यामुळे, शेकडो विद्यार्थी या गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता यासाठी मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय.



शिक्षण मंडळांनी यंदापासून त्यात बदल करून विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रत्यक्ष बोर्डाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यातच कलेचा निकाल उशिरा लागल्याने प्रस्ताव कसे पाठवायचे? असा प्रश्न शाळांपुढे होता. परंतु, आता या मुदतवाढीमुळे राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार आहेत.

अनिल बोरनारे, शिक्षक परिषद

याबाबत शिक्षण संघटनांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली व राज्यातील जवळपास ५० टक्के विद्यार्थी अतिरिक्त गुण मिळण्यापासून वंचित राहणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे आता शिक्षणमंत्र्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत कला व क्रीडा विषयाचे गुण पाठवण्यासाठी मुदतवाढ दिली.



दोन दिवसांत याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाच्या राज्यातील सर्व मंडळांना कळविण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शाळा कला व क्रीडा गुणांचे प्रस्ताव १० फेब्रुवारीपर्यंत पाठवू शकतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा