Advertisement

सेंट जाॅर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्यांना अग्निशमन प्रशिक्षण


सेंट जाॅर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्यांना अग्निशमन प्रशिक्षण
SHARES

शहर आणि उपनगरात वारंवार उद्भवणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांना अग्निशमन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सप्ताह सेंट जॉर्ज रुग्णालयात राबवण्यात येणार आहे.


ट्रेनिंग कशासाठी?

सरकारी आणि पालिका रुग्णालयात रुग्णांची सतत गर्दी होत असते. त्यामुळे, अशा परिस्थितीत जर रुग्णालयात काही विपरीत परिस्थिती उद्बवली तर त्याचा कशापद्धतीने सामना करायचा हे कर्मचाऱ्यांना कळलं पाहिजे. त्यासाठी ट्रेनिंग दिलं जाणार आहे.


आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास...

याविषयी, सेंट जॉर्जेस रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं की, 'गेल्या काही दिवसांपासून शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एका रुग्णालयात अचानक आग लागली.

सरकारी रुग्णालय म्हटलं, की रुग्ण आणि नातेवाईकांची प्रचंड गर्दी असते. अशावेळी अचानक आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आगीचा मुकाबला कसा करावा? याचं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय करावं, आगीवर नियंत्रण कसं मिळवायचं, आग पसरू नये म्हणून काय करावं, रुग्णांना सुरक्षित स्थळी कसं पोहोचवायचं याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे.

१४ ते २० एप्रिल या दरम्यान अग्निशमन दलाचा सप्ताह सुरू आहे. या दरम्यान अग्निशमन दलाचे अधिकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देतील. शिवाय, रुग्णालयात आग लागल्यास मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकते. यासाठी प्रत्येक मजल्यावर मिळून १०० हून अधिक फायर सेफ्टी सिलेंडर लावण्यात आले आहेत.

अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांच्या मार्गदर्शनाने रुग्णालयात प्रशासनाने डाॅक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठी अग्निशमन दलाच्या सप्ताहाचं औचित्य साधून अग्निशमन दलाच्या जवानांकडून अग्निशमन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

- डाॅ. मधुकर गायकवाड, अधीक्षक, सेंट जाॅर्जेस रुग्णालय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा