Advertisement

'या' शाळेत सुरू झाली पहिली 'अटल टिंकरिंग लॅब'

मुंबईतील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या (व्हीईएस) कुर्ला येथील इंग्रजी माध्यमिक शाळेत पहिली टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी ३ ऑगस्टला या पहिल्या टिंकरिंग लॅबचं उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.

'या' शाळेत सुरू झाली पहिली 'अटल टिंकरिंग लॅब'
SHARES

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी केंद्र शासनाने 'अटल टिंकरिंग लॅब' (अटल) योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत मुंबईतील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या (व्हीईएस) कुर्ला येथील इंग्रजी माध्यमिक शाळेत पहिली टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी ३ ऑगस्टला या पहिल्या टिंकरिंग लॅबचं उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.




२० लाखांचा निधी

या लॅबच्या उद्धाटनावेळी विद्यार्थ्यांनी स्मोक सेन्सर, थ्रिडी प्रिंटर, सॉल्डरिंग स्टेशन, डस्टबिन कार, अक्वा अर्लाम, ३६० डिग्री सेफ्टी, सेक्युर स्मार्ट यांसारखे विविध यंत्र बनवले होते. ही यंत्रे बनवण्यासाठी त्यांना शाळेतल्या शिक्षकांसह प्राचार्यांनीही मदत केली. विशेष म्हणजे 'अटल टिंकरिंग लॅब' सुरू करणारी विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा ही मुंबईतील पहिली शाळा असून नीती आयोगाकडून या शाळेला २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.



लॅबमधून संशोधनाचे धडे

या लॅबमध्ये विविध प्रकारच्या यंत्राचे पार्ट्स व त्याचे नमुने ठेवण्यात येणार असून त्या पार्ट्सला एकमेकांशी जोडून हे यंत्र तयार करण्याचं शिक्षण यापुढं या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या लॅबमुळं विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू व संशोधक वृत्तीच्या मदतीनं नवनवीन उपकरणं त्यांना स्वत: तयार करता येणार आहे. त्याशिवाय काही तज्ज्ञाच्या मदतीनं विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्तीतून रोबोट, कॅम्प्युटर, रणगाडे, जहाज व इतर आधुनिक वाहने कशीे तयार करायची याचे धडेही या लॅबच्या माध्यमातून दिले जाणार आहे.


विकासाला चालना

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी व पारंपरिक अभ्यासक्रमापलीकडं नेण्याची गरज आहे. 'अटल टिंकरिंग लॅब' या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक वृत्तीत वाढ होत आहे. यामुळं देशाच्या विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानाला चालना मिळेल, अस मत राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केलं.



जवळपास ३ महिन्यापासून सर्व विद्यार्थी या तंत्रावर मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासह कमीत कमी वेळात जास्तीत-जास्त वस्तूंची निर्मिती करता येणार आहे. त्याशिवाय विविध चित्र, मूर्ती तयार करणे आणि ७५० प्रकारच्या कलात्मक वस्तू स्कॅनरच्या मदतीनं तयार करण्याचही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- आशा बिनूकुमार, प्राचार्य, व्हिईएस हायस्कूल


निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ योजनेअंतर्गत 'अटल टिंकरिंग लॅब'ची सुरूवात करण्यात आली होती. ही योजना भारतातील १५०० हून अधिक शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. २०२० सालापर्यंत १० लाखांहून अधिक बालकांच्या संशोधन वृत्तीला वाव देणं हे या योजनंच उद्दिष्ट आहे.



हेही वाचा-

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

अकरावीसाठी यंदाही विशेष फेरी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा