Advertisement

जो आधी येईल, त्याला अॅडमिशन... अकरावीसाठी मंडळाचा निर्णय


जो आधी येईल, त्याला अॅडमिशन... अकरावीसाठी मंडळाचा निर्णय
SHARES

अकरावीची पाचवी विशेष फेरी होऊनही अजून ३ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या प्रक्रियेसाठी गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांचे गट केले आहेत. या गटांनुसार प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम प्रवेश देण्यात येणार आहे.


पाचवी विशेष फेरी

अकरावीच्या प्रवेसाठी चार गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पाचवी विशेष फेरी शिक्षण कार्यालयाकडून घेण्यात आली. या पाचव्या फेरीसाठी १९३३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १६,२५३ विद्यार्थ्यांचे नाव या पाचव्या फेरीच्या प्रवेशासाठी आले होते. उर्वरीत ३०८६ विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही.

त्यामुळे या आणि पाचव्या फेरीत नाव येऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २८ ऑगस्ट या काळात 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे गुणवत्तेच्या आधारे तीन गट तयार केले आहेत.


या फेरीसाठी वेळापत्रक

२० ऑगस्ट - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध
२१ ऑगस्ट - गट क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेणे
२१ ऑगस्ट - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
२२ ऑगस्ट - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे - सायंकाळी ५ वाजता
२३ ऑगस्ट - गट क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेणे
२३ ऑगस्ट - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
२४ ऑगस्ट - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे - सायंकाळी ५ वाजता
२६ ऑगस्ट - गट क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेणे
२६ ऑगस्ट - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे


हे आवश्य करा

१. रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयाची निवड
२. आपल्या शाखेनुसार कॉलेजचा सांकेतिक क्रमांक, महाविद्यालयाचे नाव, अनुदानित- विनाअनुदानित गोष्टींचा तपशील नीट भरणे आवश्यक
३. ऑनलाईन प्रवेशाची पावतीची प्रिंट काढणे आवश्यक
४. प्रिंट केलेली पावती घेऊन महाविद्यालयात प्रवेशघेण्यासाठी येणे बंधनकारक



हे देखील वाचा -

विद्यार्थ्यांना दिलासा! पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याची डेडलाईन वाढवली

गोपनीय निकालाऐवजी गुणपत्रिका



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा