Advertisement

गोपनीय निकालाऐवजी गुणपत्रिका


गोपनीय निकालाऐवजी गुणपत्रिका
SHARES

यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना गोपनीय निकाल न देता, गुणपत्रिका देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. परदेशातील महाविद्यालय गोपनीय निकाल गृहीत धरत नसल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना गोपनीय निकाल न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता अशा विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत.

राज्यपालांनी दिलेली ३१ जुलैची डेडलाईन विद्यापीठाने न पाळल्यामुळे परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. निकाल वेळेत लागला नाही, तर आम्हाला व्हिसा मिळणार नाही आणि व्हिसा मिळाला नाही, तर परदेशात जाऊन शिक्षण घेता येणार नाही, अशा अनेक तक्रारी परीक्षा भवनात आल्या होत्या.

अशा विद्यार्थ्यांना गोपनीय पद्धतीने निकाल देण्याचे विद्यापीठाने कबूल केले आणि त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांना गोपनीय पद्धतीने निकाल देण्यात आले. परंतु व्हिसा कार्यालयाकडून गोपनीय निकाल ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, केवळ गुणपत्रिकाच ग्राह्य धरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती.

त्यामुळे परदेशातील महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल युद्धपातळीवर लावण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका देण्यात येणार आहे.



हे देखील वाचा -

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा