Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

पदवी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी संध्याकाळी जाहीर होणार

मुंबई विद्यापीठाकडून पदवीच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीनंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे

पदवी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी संध्याकाळी जाहीर होणार
SHARES

मुंबई विद्यापीठाकडून पदवीच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीनंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. २९ मेपासून सुरू झालेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी तब्बल २ लाख ६२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ८३ हजार ८९६ एवढे अर्ज केले आहेत.  

नाव नोंदणीची प्रक्रिया

पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठानं प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे ते १५ जून २०१९ पर्यंत राबविली होती. यामध्ये वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले असून त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यानी अर्ज केले आहेत.

पहिली गुणवत्ता यादी

प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार सोमवारी संध्याकाळी ५ वाजता संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. कागदपत्रं पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही १८ ते २० जून २०१९ पर्यंत राहणार आहे

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई विद्यापीठातर्फे २०१९-२० साठी प्रथमवर्ष बीए, बीएससी, बीकॉम, बीएमएमएम, बीएसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर आॅफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएससी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएससी (कॉम्प्युटर सायन्स), बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएससी (मायक्रोबायोलॉजी), बीएससी (बायो-केमेस्ट्री), बीएससी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएससी (मेरिटाईम), बीएससी (नॉटीकल सायन्स), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), बीएससी (होम सायन्स), बीएससी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएससी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, फार्मा अ‍ॅनेलिटिकल सायन्स, टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रवेशपूर्व नावनोंदणीच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


अभ्यासक्रमाचे नाव
प्रवेश अर्जांची संख्या
बीए 
५५९०७
बीकॉम  (अकाउंट अँड फायनान्स)
७३८८८
बीकॉम (बँकिंग अँड इन्श्युरन्स)
२२९४७
बीकॉम  (फायनान्शिअल मार्केट)
१५०४४
बीकॉम
२१६८११
बीएमएस 
१४४१४३
बीएमएम
५१०७९
बीएससी
५७८५९
बीएससी (आयटी
६२०५८
बीएससी (कॉम्प्युटर सायन्स)
३४७८७
बीएससी (बायोटेक)
१७५३७हेही वाचा -

प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

'आयाराम गयाराम, जय श्रीराम', विरोधकांनी केलं मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांना लक्ष्यRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा