Advertisement

'आयाराम गयाराम, जय श्रीराम', विरोधकांनी केलं मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांना लक्ष्य

विखे-पाटील यांना उद्देशून विरोधकांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' या घोषणा दिल्या. तर, 'आले रे आले चोरटे आले' असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

'आयाराम गयाराम, जय श्रीराम', विरोधकांनी केलं मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांना लक्ष्य
SHARES

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस तसंच नवनिर्वाचीत गृहनिर्माणमंत्री विधानभवनात दाखल होताच विरोधकांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री आणि विरोधक आमने-सामने असल्याचं पाहायला मिळालं. विखे-पाटील यांना उद्देशून विरोधकांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' या घोषणा दिल्या. तर, 'आले रे आले चोरटे आले' असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.  

राज्य सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पडला. मागील साडेचार वर्षे राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेतील विरोधीपक्ष नेते म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करत होते. तेच या अधिवेशनात भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आल्यावर विरोधकांनी आयाराम, गयाराम, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर, 'विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग', आले रे आले चोरटे आले, अशा घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं.  

विधानसभा सभागृहात कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपद देणं योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड योग्य प्रक्रियेप्रमाणेच झाल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. 



हेही वाचा-

भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे केले आहेत काय?- अजित पवार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा