Advertisement

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची ३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचं वेळापत्रक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची ३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी
SHARES

अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचं वेळापत्रक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे.

वेळापत्रक प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. या वेळापत्रक अर्जाचा भाग २ ते पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंत वेबसाईटवर दिले आहे पुढील प्रवेश फेरी तसंच विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मागील महिन्यात सुरुवात झाली आहे. यावेळी  विद्यार्थ्यांना २६ जुलैपासून प्रवेशाचा भाग १ भरण्यास वेळ दिला होता. त्यानंतर आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपासून भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेज पसंतीक्रम भरायचा आहे.

ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश अर्जाचा भाग १ अजूनही भरणे बाकी आहे त्यांना सुद्धा भाग १ आणि भाग २ सोबत भरायची संधी आहे. १२ ऑगस्टपासून अल्पसंख्यांक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश आणि पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे.  

ज्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळाले त्यांना त्या कॉलेजात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश न घेतल्यास त्यांना विशेष फेरीपर्यत थांबावे लागेल. शिवाय ज्यांनी पहिल्या फेरीत पहिला सोडून इतर पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळून सुद्धा प्रवेश निश्चित केले नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये सहभागी होता येईल.

वेळापत्रक

१२ ते २२ ऑगस्ट : अर्जाचा भाग २ भरणे. यामध्ये पहिल्या नियमित गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे, कोट्याअंतर्गत प्रवेश, कोट्यातील शिल्लक जागा ऑनलाईनसाठी उपलब्ध करणे.

२३ ते २५ ऑगस्ट : तात्पुरती- संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर. यामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्याचा समावेश असेल. यादीवर हरकती, आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येईल.

३० ऑगस्ट : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर : संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यात येतीलहेही वाचा -

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
संबंधित विषय