Advertisement

आयडॉलच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास १२ जुलैपासून सुरुवात


आयडॉलच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास १२ जुलैपासून सुरुवात
SHARES

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापिठाच्या संलग्नित महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून गुरुवारी १२ जुलैपासून दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) ची  प्रथम वर्षाच्या पदवी प्रवेशास सुरूवात करण्यात आली आहे.  बीए, बी कॉम, बीएससी (आयटी), बीएससी (कॉम्प्युटर सायन्स) या अभ्यासक्रमासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार अाहे. 


प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं

गेल्या शैक्षणिक वर्षात ६८ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यात २७ हजार १३६ मुलं, तर ४१ हजार ४३२ मुलींचा समावेश असून या मुलींची संख्या लक्षणीय होती. द्वितीय व तृतीय वर्षाचं बीए, बी.कॉम, बीएससी आयटी, बीएससी कॉम्प्युटर सायन्स, एमए, एमए इन एज्युकेशन, एमकॉम, एमएससी (गणित, आयटी, कॉम्प्युटर सायन्स) यांसारख्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं होणार असून याची संपूर्ण माहिती mu.ac.in/portal/distance-open-learning/ किंवा http://idoloa.digitaluniversity.ac/ या वेबसाईटवर देण्यात आली आहे.


विद्यार्थी प्रवेश सहायता केंद्र

विद्यार्थ्यांचा प्रवेश सुलभरित्या व्हावा यासाठी एमकेसीएलचं एमएससीआयटी केंद्र (mkcl-ms-cit) विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत. यासंबंधीत अनेक सहायता केंद्र मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई,  कोकण येथे उपलब्ध करून देण्यात आली असून याबाबतची संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे



हेही वाचा -

विद्यापीठाच्या निकालांवर कुलगुरूंची करडी नजर

पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा