Advertisement

दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार १ लाख ४० हजार ९२९ विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी ७० हजार ०६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. पहिल्या प्रवेशप्रक्रियेतील यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक ४४ हजार ०५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.

दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
SHARES

नुकतीच अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार १ लाख ४० हजार ९२९ विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी ७० हजार ०६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. पहिल्या प्रवेशप्रक्रियेतील यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक ४४ हजार ०५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखेसाठी १८ हजार ४५१, कला (आर्ट्स) शाखेसाठी ६ हजार ८७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहे. परंतु दुसऱ्या यादीत एचएसव्हीसीसाठी फक्त ६८६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.


किती विद्यार्थी?

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजार ३८१ आहे. तर एकूण प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार ०६३ इतकी आहे. तसंच नुकत्याच जाहीर झालेल्या अकरावीसाठी राज्य महामंडळाच्या ६५ हजार ४२१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १ हजार ७३४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तसंच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या २ हजार ९०८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.'इथं' मिळेल माहिती

अकरावी प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवरील Centralized Allocation Result 2 या ऑप्शनला क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याला प्रवेश मिळालेल्या विद्यालयाची माहिती मिळेल. दुसऱ्या गुणवत्ता यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १९ ते २१ जुलैदरम्यान आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.


२५ जुलैपर्यंत प्रिंट काढा

त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाला नसेल त्यांना तिसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम बदलायचा असल्यास त्यांना तो बदलता येणार आहे. परंतु पसंतीक्रम बदल्यानंतर २३ ते २४ जुलैपर्यंत त्याची प्रिंट काढावी लागणार आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलले नसतील, त्यांचे पूर्वीचेच पसंतीक्रम पुढील यादीसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आली आहे.हेही वाचा-

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई विद्यापीठाची एकशे एकसष्ठी!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा