Advertisement

अकरावीच्या प्रवेशासाठी एका दिवसाची मुदतवाढ


अकरावीच्या प्रवेशासाठी एका दिवसाची मुदतवाढ
SHARES

अकरावीच्या चौथ्या यादीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी रक्षाबंधनची सुट्टी असल्याने बुधवार ९ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतील.


बुधवारपासून अकरावीचे वर्ग सुरू

एवढेच नव्हे, तर अकरावीचे वर्गही बुधवारपासून सुरु करण्यात येतील, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. या अगोदर अकरावीच्या ३ याद्या जाहीर झाल्या आहेत. या तीन्ही यादीत १ लाख ६१ हजार १०४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी १ लाख ३२ हजार ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

तर कोट्यामधून ४५ हजार १०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी गरज पडल्यास वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.


चौथी यादी जाहीर

अकरावीच्या चौथ्या यादीसाठी तब्बल ४६ हजार १२४ प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील ९ हजार ३८५ विद्यार्थी शिल्लक आहेत. शिल्लक विद्यार्थ्यांची विशेष फेरी घेऊन प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.


शिक्षक मानधनाच्या प्रतिक्षेत

दहावीची परीक्षा होऊन चार महिने उलटले. पेपर तपासणीही पूर्ण झाली, तरीही शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीच्या मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. शिक्षकांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमाच झालेले नाहीत. २४ जूनला दहावीच्या मुलांच्या हातात गुणपत्रिकाही पडल्या. त्याच वेळी खरेतर शिक्षकांना मानधन मिळणे अपेक्षित होते.


दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक आपले काम चोख पार पाडतात. विविध विषयांच्या उत्तरपत्रिका महिनाभराच्या आत तपासून पूर्ण होतात. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे मानधनही वेळेत मिळणे आपेक्षित असते. परंतु ४ महिने उलटून गेले, तरी शिक्षकांना मानधन मिळालेले नाही.
- अनिल बोरनरे, अध्यक्ष, शिक्षक परिषद


पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना मानधन देण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांना लवकरात लवकर त्यांच्या कामाचा मोबदला मिळेल.
- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ



हे देखील वाचा -

ऑफलाईन प्रवेश घेऊ नका


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा