बोरीवलीतील अजित पवार कॉलेजची मान्यता रद्द

 Borivali
बोरीवलीतील अजित पवार कॉलेजची मान्यता रद्द

बोरीवलीतील अजित पवार ज्युनिअर कॉलेजची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे. या कॉलेजने गेल्या वर्षी ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे स्पष्ट झाल्याने या कॉलेजवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेश ऑनलाईन घेण्यास सांगितले असतानाही या कॉलेजने ऑफलाईन प्रवेश दिल्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी या कॉलेजवर कारवाईचा बडगा उगारत कॉलेजची मान्यता रद्द केली आहे.

अकरावीमध्ये ऑनलाईन प्रवेश देणाऱ्या कॉलेजवर ही पहिलीच कारवाई आहे. पवार कॉलेजने सायन्स शाखेत 120 विद्यार्थी क्षमता असताना 544 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. तर कॉमर्स शाखेत 86 अतिरीक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने कॉलेजकडे खुलासा मागत नोटीस पाठवली होती. मात्र दीड ते दोन महिने नाटीशीचं उत्तर शाळा प्रशासनाकडून देण्यात आलं नाही. त्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पवार कॉलेजवर केलेली कारवाई ही माध्यमिक शाळा नियमानुसार असल्याचं शिक्षण उपसंचालक विभागानं स्पष्ट केलं आहे.

Loading Comments