Advertisement

School Reopen : राज्यातील शाळा १ डिसेंबरपासूनच सुरू, 'या' आहेत गाईडलाईन्स

शाळा सुरू करताना नेमकी कोणती खरबदारी घ्यावी, यासाठी राज्य सरकारनं नियमावलीदेखील जारी केली आहे.

School Reopen : राज्यातील शाळा १ डिसेंबरपासूनच सुरू, 'या' आहेत गाईडलाईन्स
SHARES

राज्यातील शाळा येत्या १ डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. पण नुकत्याच आलेल्या दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटनं सरकार आणि पालिकेच्या चिंतेत वाढ केली. पण असं असलं तरी १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे.

त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी, महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग १ डिसेंबपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसंच शाळा सुरू करताना नेमकी कोणती खरबदारी घ्यावी, यासाठी राज्य सरकारनं नियमावलीदेखील जारी केली आहे.

'या' आहेत मार्गदर्शक सुचना

  • एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत
  • एका बाकावर एकच विद्यार्थी असावा
  • दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे
  • शिक्षकांची सोय त्याच गावात त्याच शहरात राहण्याची करावी
  • गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात येऊ देऊ नये
  • वर्ग आळीपाळीने म्हणजे काही वर्ग सकाळी तर काही वर्ग दुपारी असे करावे
  • विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले असणे बंधनकारक
  • विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी
  • स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झाले असणे बंधनकारक
  • बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी
  • सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार
  • ३ ते ४ तासच शाळा भरणार
  • मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी
  • विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक
  • घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे
  • जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार
  • पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा

सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा १ डिसेंबरला सुरू होणार आहे.



हेही वाचा

मुलांना शाळेत पाठवण्यासाठी ३४ टक्के पालकांचा नकार

खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ, सरकारी शाळांकडे वाढता कल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा