Advertisement

मुलांना शाळेत पाठवण्यासाठी ३४ टक्के पालकांचा नकार

सुमारे ३४% पालकांनी अद्यापही त्यांच्या मुलांना ऑफलाइन शाळेत जाण्यासाठी संमती दिली नाही.

मुलांना शाळेत पाठवण्यासाठी ३४ टक्के पालकांचा नकार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, सुमारे ३४% पालकांनी अद्यापही त्यांच्या मुलांना ऑफलाइन शाळेत जाण्यासाठी संमती दिली नाही.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये ऑफलाइन लेक्चर्स पुन्हा सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. COVID-19 साथीच्या आजारामुळे बहुतेक पालक आपल्या मुलाच्या आरोग्याबद्दल चिंतेत आहेत. यामुळे, महापालिकेच्या शिक्षण विभागानं त्यांच्या पालकांना ऑफलाइन क्लासेसमध्ये उपस्थित राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

BMC च्या आकडेवारीनुसार, एकूण ८०९ शाळांनी इयत्ता ८-१० साठी ऑफलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यांच्याकडे सुमारे ७१,९२३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४७,६३४ (६६.२%) च्या पालकांनी त्यांच्या मुलांना ऑफलाइन वर्गांसाठी पाठवण्यास संमती दिली आहे. तर २४,२८९ विद्यार्थ्यांनी (३३.८ टक्के) अद्याप त्यांच्या पालकांची संमती नाही.

याची अनेक कारणे आहेत. त्‍यामध्‍ये इच्‍छा नसणं हे सर्वात सामान्य कारणं आहे. इतर कारणांमध्ये आरोग्याची चिंता, स्थलांतर, अन्य काही शाळेत बदली आदींचा समावेश आहे. महापालिका उपायुक्त अजित कुंभार यांनी ‘मिड-डे’शी बोलताना सांगितलं की, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढेल.

दुसरीकडे, मुंबईत ऑफलाइन लेक्चर्स सक्तीचे करण्याची मागणी शाळा प्रशासन महाराष्ट्र सरकारला करत आहेत. सध्या, इयत्ता ८-१२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शालेय शिक्षणाची परवानगी आहे. ग्रामीण महाराष्ट्रात असताना, इयत्ता ५-१२ च्या वर्गांना पालकांच्या संमतीनं ऑफलाइन व्याख्यानाची परवानगी आहे.हेही वाचा

खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ, सरकारी शाळांकडे वाढता कल

विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा