Advertisement

खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ, सरकारी शाळांकडे वाढता कल

मागील दोन वर्षात खास करून कोरोना काळात खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांकडे धाव घेतल्याचं चित्र आहे.

खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ, सरकारी शाळांकडे वाढता कल
SHARES

मागील दोन वर्षात खास करून कोरोना काळात खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांकडे धाव घेतल्याचं चित्र आहे. 'असर' (ASAR) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण हे ९.५ टक्क्यांनी तर देशात ६ टक्क्यांनी वाढलं आहे.

सरकारी शाळांची पटसंख्या कमी होऊन अनेक सरकारी शाळा बंद करण्याची वेळ आली होती. मात्र, आता याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कोरोना काळात वाढलेली पाहायला मिळत आहे. २०१८ च्या तुलनेत यावर्षी ९.५ टक्क्यांनी सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहे.

'असर' रिपोर्टमध्ये राज्यातील ९९० गावांतील ६ ते १६ या वयोगटातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३२.५ टक्क्यांवरून २४.४ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यातही मुलांच्या तुलनेनं मुलींना शासकीय शाळेत दाखल करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.

सरकारी शाळांमध्ये प्रवेशाची कारणं

  • शहरांकडून ग्रामीण भागांत मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर
  • कोरोनामुळे अनेक क्षेत्रांतील अर्थकारणावर परिणाम
  • कोरोनाकाळात अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात घट
  • खासगी शाळांची वाढलेली भरमसाठ फी
  • छोट्या खासगी शाळांचे अर्थकारणही ढासळल्यानं अनेक शाळा बंद करण्याची आलेली वेळ
  • कोरोना काळात सरकारी शाळांची विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा