Advertisement

बारावी परिक्षेचं हॉलतिकीट मिळण्यास सुरूवात

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या बारावी परीक्षेचं (XII exam) हॉल तिकीट (Hall ticket) मंगळवारपासून उपलब्ध झाले आहे. कॉलेजांच्या लॉगइन (Login) वर विद्यार्थ्यांना (student) हॉलतिकीट मिळणार आहे.

बारावी परिक्षेचं हॉलतिकीट मिळण्यास सुरूवात
SHARES

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या बारावी परीक्षेचं (XII exam) हॉल तिकीट (Hall ticket)  मंगळवारपासून उपलब्ध झाले आहे. कॉलेजांच्या लॉगइन (Login) वर विद्यार्थ्यांना (student) हॉलतिकीट मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावी परीक्षेचं हॉलतिकीट उपलब्ध करून दिलं जात आहे. कॉलेजांनी विद्यार्थ्यांची हॉलतिकीट डाऊनलोड (Download) करून ती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले (Secretary Dr. Ashok Bhosale) यांनी केली आहे.

हॉलतिकीट (Hall ticket) ऑनलाइन (online) पद्धतीने प्रिंटिंग (printing) करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही शुल्क (fee) घेऊ नये. तसेच हॉल तिकीटची प्रिंट (print) काढून त्यावर मुख्याध्यापकांचा (headmaster) / प्राचार्यांचा (Principal) शिक्का मारून स्वाक्षरी (sign) करावी, अशी सूचनाही  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) कॉलेजांना केली आहे. हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यमबदलात दुरुस्त्या असल्यास कॉलेजांनी विभागीय स्तरावर जाऊन दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित कॉलेजांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत' असा शेरा देऊन विद्यार्थ्यास हॉलतिकीट देण्याची सूचनाही मंडळाने केली आहे.

बारावीची परीक्षा  (XII exam) १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा (Tenth Exam) ३ मार्चपासून सुरू होणार आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दोन्ही परिक्षांचं सविस्तर वेळापत्रक mahahsscboard.in या वेबसाइटवर जाहीर केलं आहे.  बारावीची परीक्षा मंगळवार १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन बुधवार  १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे. तर दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्च २०२० रोजी सुरू होणार आहे. दहावीची परिक्षा सोमवार २३ मार्च रोजी संपणार आहे.  बारावीची परीक्षा मंगळवार १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन बुधवार  १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे. 


  • फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या बारावी परीक्षेचं (XII exam) हॉल तिकीट (Hall ticket)  मंगळवारपासून उपलब्ध झाले आहे. 
  • कॉलेजांच्या लॉगइन (Login) वर विद्यार्थ्यांना (student) हॉलतिकीट मिळणार आहे. 
  •  बारावीची परीक्षा मंगळवार १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन बुधवार  १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे. 
  • दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्च २०२० रोजी सुरू होऊन सोमवार २३ मार्च रोजी संपणार आहे. 




हेही वाचा - 

वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

मुंबई विद्यापीठाकडून पेपरलेस परीक्षेचं नियोजन

चित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा